लोकशाहीची शान व्यक्तीचं मतदान!

लेखक - सुनील अहिर

निवडणूक म्हटलं की एखाद्या उत्सवासारखं रंगीबेरंगी वातावरण तयार केलं जातं ज्यामुळे अगदी तळातील व्यक्ती सुद्धा स्वत:ला आज पर्यंत अलिप्त ठेऊ शकला नाही.भारतीय मतदान हि एकमेव अशी व्यवस्था अशी आहे कि तळातील व्यक्ती पासून मध्यमवर्ग, नोकरदार, व्यवसायिक पासून समाजिक ते राजकीय अशा कोणत्याही व्यक्ती सोबत भेदभाव करत नाही.

भारतीय लोकशाही हि जगात वरच्या नंबर उठून दिसते ती याचमुळे कि या देशातील व्यक्तीला स्वतंत्रभारतात मतदान हक्काकरिता झगडावं लागलं नाही . एक व्यक्ती एक मत एक मुल्ये, हे स्पष्ट समतेच रूप कोणत्याही व्यक्तीला नाकारता येणार नाही . युरोपातील काही देशाचं उदाहरण पाहिलं तर मतदान हक्का करिता सामन्य व्यक्तीला संघर्ष करावा लागला, तो भारतात याची गरज पडली नाही. याचा अर्थ आपण मतदानाला निरुपयोगी,किंवा कमी महत्वाचं समजण्याची गरज नाही.मतदान पात्र व्यक्तीचा अभिनानसह अधिकार आहे. या साथी आपण मतदानाला डोळस पणे पाहण्याची आवश्यकता आहे, असं आम्हाला वाटतं! देशात १०० टक्के मतदान होतांना दिसत नाही. सर्व पात्र व्यक्तींनी मतदान केल्याशिवाय आपल्याला देशातील लोकशाहीला पाठबळ देता येणार नाही .

हि आज सांगण्याची गरज का? तर.२०१९ मध्ये देशातील संसद मधील लोकसभेतील प्रतिनिधीची निवड करणार आहोत. यातून देशाचा पंतप्रधान निवडला जाईल. आणि भविष्यात योजना, कायदा, देश संरक्षण व इतर बाबीवर जनतेच्या वतीने निर्णय घेणार आहेत.

म्हणून योग्य व्यक्ती लोकसभेत पाठविण्याची आपली नैतिक जबबदारी समजून आपण या प्रक्रियेचा भाग बनलो पाहिजे. एक प्रतिनिधीला मासिक ३ लाख पगार दिला जातो.आपल्या मतदारसंघाचा विकास

करण्यास लाखो रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो. आता आपल्याला काय करायचे आहे.

- मतदार यादीत स्वत:चं नावं आहे किंवा नाही याची खात्री करा.

- प्रतिनिधी (उमेदवार) कोण आहे त्याच्या संबधी जाणून घ्या.

- स्वत:मतदान करा

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर खालील ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून

तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता.

1) पारपत्र (पासपोर्ट)

2) वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

3) केंद्र किंवा राज्य सरकारकडून जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र

4) पब्लिक सेक्टर कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे जारी केलेले छायाचित्र

असलेले ओळखपत्र

5) पॅन कार्ड

6) आधार कार्ड

7) बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक

8) छायचित्र असलेली पेंशनचे ओळखपत्र

9) मनरेगा जॉब कार्ड

10) कामगार मंत्रालयाद्वारे स्वास्थ विम्याच्या उद्देशाने जारी केलेली अधिकृत छायाचित्र मतदान चिठ्ठी (फोटो वोटर स्लिप)

11) आमदार किंवा खासदार यांच्या कार्यालयातून जारी केलेले ओळखपत्र