ग्रासरुट्स नेतृत्वाचे व्यवस्थापन प्रकिया

कोरो च्या माध्यमातून “ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व” ह्या सन 2008 पासून ग्रासरुट्स नेतृत्व विकास कार्यक्रम सुरू आहे. आधी महाराष्ट्र आणि नंतरच्या टप्प्यात राजस्थान ह्या दोन्ही राज्यात आजपर्यत 1135 लीडर्स ह्या प्रकियेतून तयार झाले असून ते त्यांच्या क्षेत्रात बदलाचे काम करत आहेत.2008 पासून ह्या कार्यक्रम/प्रकियेशी मी वेगवेगळ्या भूमिकेतून जोडून आहे, प्रत्यक्ष समन्वय, संवाद, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन हे माझ्या भूमिकेचे मुख्य बिंदु राहिले आहेत.

यातील “व्यवस्थापन” ह्या बिंदुभोवती अधिक फोकस काम गेली वर्षभर सुरू आहे आणि त्यातून ग्रासरुट्स नेतृत्वाचे व्यवस्थापन कसे करायचे याची स्पष्टता येण्याची सुरवात होतेय असे वाटते. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आमचे ग्रासरुट्स लीडर्स हे भाषा, संस्कृती, शिक्षण, सामाजिक-राजकीय ह्या निकषावर बहुजिनसी आहेत आणि तरीही ते सर्व “वंचित समूह) ह्या निकषावर एकजिनसी आहेत, आणि त्यामुळेच ग्रासरुट्स नेतृत्वाचे व्यवस्थापन कसे करायचे याची स्पष्टता येण्याची सुरवात होतेय असे वाटते असे नमूद करावेसे वाटते.

तर, ग्रासरुट्स नेतृत्वाचे व्यवस्थापन तीन प्रकियेमध्ये करावे लागते, आणि ह्या तीनही कधी -कधी एका मागून एक अशा पद्धतीतीने किवा एकाच वेळी कराव्या लागतात आणि ह्या तीन प्रकिया म्हणजे, फेसिलिटेशन, हॅंड-होल्डिंग, आणि आंकरिंग

फेसिलिटेशन : कार्यक्रमात आल्यापासून किंबहुना आमच्या निवडप्रकिया पासून Facilitation ची सुरवात होते,प्रत्येक टप्प्यावर आमचे टिम सदस्य ( सरासरी 15 लीडर्स मागे एक टिम सदस्य ज्यांना आम्ही विभाग समन्वयक असे म्हणतो ) प्रत्येक बाबींचे सुलभीकरण करतात. ज्यामध्ये लीडर्सना एक व्यक्ती म्हणून ते त्याची कौटुंबिक, सामाजिक, संस्कृतिक, राजकीय पार्श्वभूमी समजून घेणे आणि तसे समजून घेण्यास लीडर्स ना तयार करणे. आणि पुढे जसा जसा कार्यक्रम पुढे जातो, तसे तसे Facilitation प्रकिया अधिक सखोल होत जाते ज्या मध्ये आमचे टिम सदस्य हे प्रत्येक लीडर्स ना “One to One” ह्या लेवल वर ट्रॅक करू शकतात.

हॅंड-होल्डिंग: Facilitation करतानाच आवश्यक त्या टप्प्यावर आधार देणे ही एक महत्वाची पातळी आहे. आणि हा आधार पुन्हा वैयक्तिक अडचणी पासून ते प्रत्यक्ष कामात येणार्‍या सर्व अडचणी मध्ये देण्याचा प्रयत्न आमचे टिम सदस्य करतात. आणि ह्या मुळेच लीडर्सना त्यांचे संस्थाप्रमुख/मेंटर यांच्यापेक्षा आमचे टिमसदस्य हे अधिक जवळचे वाटत असावेत, अर्थात सर्वच लीडर्स बाबतीत असे होत नाही परंतु “ग्रासरुट्स नेतृत्वाचे व्यवस्थापन” बद्दल विचार करताना Facilitation सोबत Hand-holding प्रकिया महत्वाची आहे हे येथे अधोरेखित करावेसे वाटते. आणि तिसरी प्रकिया म्हणजे

आंकरिंग : वरील दोन्ही प्रकियेदरम्यान कधीकधी लीडर्सच्या वतीने कृती करावी लागते, कारण अशा वेळेस लीडर्सना काही सुचत नाही, एकदम “block” अशी अवस्था होते, अशा वेळेस आमचे टिम सदस्य हे लीडर्सच्या वतीने अशी कृती करतात ज्यायोगे “unblock” ची प्रकिया सुरू होते आणि लीडर्स मग त्या प्रकिएस पुढे घेऊन जातात.

वर म्हंटल्याप्रमाणे ह्या तीनही प्रकिया ह्या एकमेकांशी निगडीत असल्याने कधी काय करायचे ह्याचा निर्णय घेणे हे खूप महत्वाचे आहे, आमचा गेल्या दहा-बारा वर्षातील एकूण अंनुभावातून “ग्रासरुट्स नेतृत्वाचे व्यवस्थापन” करण्यासाठी वरील तीन प्रकिया समोर येत आहेत आणि ह्या तीन प्रकियेबरोबर सतत संवाद आणि समन्वय हेही तेवढेच महत्वाचे आहे. अशा प्रकारे जाणीवपूर्वक प्रत्येक लीडर्ससोबत आमचे टिम सदस्य “One to One” काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, सध्या सुरू असलेला 73 लीडर्ससोबतचा कार्यक्रम सप्टेंबर -20 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि ह्या ग्रासरुट्स नेतृत्व विकास कार्यक्रमातून बदलाची 73 उदाहरणे निश्चितपणे महाराष्ट्रात समोर येतील विश्वास आहे.

( कोरो द्वारा सुरू असेलेल्या महाराष्ट्र ग्रासरुट्स लीडरशिप डेवलंपमेंट कार्यक्रमा मधील सर्व टिम सदस्य यांच्यासोबतच्या चर्चेच्या आधारे वरील लिखाण केलेले आहे.)